महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठवाड्यातील प्रसिद्ध श्वसनविकार व दमारोग तज्ञ आणी गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भराटे यांनी दमा व त्यांचे दुष्परिणाम आणी दमा समज गैरसमज यावर प्रकाश टाकला आहे. डॅाक्टर नेहमीच आपल्या रुग्णांसाठी अहोरात्र झटत असतात.विसाव्या शतकातील भारत हा एकविसाव्या
शतकात आरोग्य व आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला आहे.आज ही डॅाक्टर व रुग्ण यांचे नाते कौटुंबिक असल्यासारखे असते .आज दि.7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन असुन लातुरातील प्रसिद्ध श्वसनविकार वछातीविकार तज्ञ डॅा रमेश भराटे यांनी दमा व त्यांचे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला आहे आणी दमा समज गैरसमज यावर सविस्तर माहिती सांगितली आहे.
दमा (Asthma) म्हणजे काय ? – दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज योतो.
अस्थमाची लक्षणे – खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते*. *पण पुन्हा खोकला येतोच. दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.
दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा अटॅक येणे म्हणजे काय ? – दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो.
दमा (Asthma) होण्याची कारणे – शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात. ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक येतो. धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो, सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे, शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे पण दमा होतो.
दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी.
– अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते, दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,
मानसिक ताणतनाव रहित रहावे, धुळ, धूर, हवेच्या
प्रदुषणापासून दूर रहावे, दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत, पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे, थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात आणी डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत. डॅा.रमेश भराटे – श्वसनविकार व दमारोग तज्ञ ( गायत्री हॅास्पीटल लातुर )