कल्याण क्राईम ब्रांच कडून राज निवास गुटखा बनवला जात असलेल्या कारखान्यावर छापा

महाराष्ट्र खाकी (कल्याण / विवेक जगताप ) – कल्याण क्राईम ब्रँचची गुटखा कारखान्यावर मोठी कारवाई  कुडावली गावात एका कारखान्यात राज निवास गुटखा बनवला जात असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन,

गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला . बदलापूर काटड़ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त केला आहे. कल्याण क्राईम

ब्रँचच्या पथकाचा तपास सुरू असताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुडावली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला आहे. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा

कच्चामाल असा तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. कल्याण क्राईम ब्रँचने याप्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विराज हा या आधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या

गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संडाय पोलिसांना आहे याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Recent Posts