महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका शेत तळ्या खाली चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्याची सध्या पोलीस दलात आणी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात खूप चर्चा होताना दिसत आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाचा कारभार IPS सोमय मुंडे यांच्याकडे आल्यापासून
जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैद्यधंदे यांचा आलेख कमालीचा उतरताना दिसत आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कौतुक आणी आभार वेक्त करत आहेत. जिल्ह्यातील मटका तर जवळ – जवळ हद्दपार झाला आहे. ग्रामीण भागातील जुगार आड्यावर करावा्यांचा धडाका लावून जुगार खेळणारे आणी
खेळवणारे यांच्या मनात पोलिसांची धसकी भरली आहे बेकायदेशीर दारू विक्रीच्या बाबतीतही अशीच परिस्तिथी आहे. या सर्व कारवायामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे राज्यात आणी जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष आणी कारवायातील सिंघम अधिकारी म्हणून कौतुक आणी वेकली ओळख निर्माण झाली आहे. पण या कर्तुत्वाला
कुठेतरी रेणापूर जवळील शेत तळ्याच्या खाली चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्याच्या चर्चे मुळे गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. खर तर LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकिले यांनी या चर्चेची शहानिशा करून मोठी कारवाई करायला पाहिजे होती पण तस होताना दिसून येत नाही हे दुर्देव आहे. LCB प्रमुख
संजीवन मिरकिले यांच्या ने्तृत्वात मागील काळात गुटखा विक्रेत्यावर अनेक कारवाया झाल्या आहेत. अशीच कारवाई या कारखान्यावर केलीतर जिल्ह्यातून मटका जसा हद्दपार झाला आहे तसा गुटखा पण हद्दपार होईल असा नागरिकांना आणी पोलिसांना विश्वास आहे. पण या कारखान्यामुळे महाराष्ट्रात बंद असलेला गुटखा विक्रीचा
आणी तयार करण्याचा एक विजयश्री निर्माण करून गुटख्याचे केंद्र निर्माण होईल जर लातूर पोलिसांनी खासकरून अन्न व औषध प्रशासन आणी LCB ने शहानिशा करून कारवाई नाही केली तर..!