सुप्रसिद्ध डॉ. प्रमोद घुगे यांच्या आयकॉन हॉस्पिटल च्या माध्यमातून मराठवाड्यातील रुग्णांची किडनी प्रत्यारोपणासाठीची वणवण थांबणार

महाराष्ट्र खाकी (प्रतिनिधी / लातूर ) – मराठवाड्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. प्रमोद घुगे यांच्या आयकॉन हॉस्पिटलचे नव्या वास्तूत स्थलांतर झाले असून या प्रकल्पाने लातूरच्या वैभवात भर तर निश्चित पडलीच आहे. परंतु आयकॉन आता रुग्णांसाठी आयडॉल ठरत आहे. एवढेच नाही तर मराठवाड्यातील रुग्णांचे किडनी

उपचारासाठी साठी वणवण फिरणे आता कायमस्वरूपी थांबणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना एम.बी.बी.एस (MBBS) सहं एम.डी. (MD) व डी.एम.नेफ्रॉलॉजीस्ट ई. पदव्या मिळवताना सातत्याने आपली उत्तीर्ण गुणवत्ता अबाधित ठेवत राज्य – देशपातळीवरील यादीत अगदी वरच्या टोकाचे क्रमांक

मिळवत सुवर्णपदक मिळवलेल्या भरातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक नामांकित मल्टीस्पेशलिटी – सुपरस्पेशलिटी रुग्णालयात मागेल त्या पॅकेजची ऑफर असतानाही डॉक्टरांनी त्या स्वीकारल्या नाहीत. केवळ अनुभव गाढठीशी असावा म्हणून त्यांनी काही काळ पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलला आपल्या स्पेशल

किडनी विषयात काम केले. हे काम करण्यापूर्वी आणि लातूरला येईपर्यंत तब्बल दोन हजार किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांच्या शिदोरी गाठीशी घेऊन डॉ.घुगे जगाच्या कुठेही आपले विश्व निर्माण करू शकले असते परंतु हे विश्वची माझे घर, न म्हणता त्यांनी माझे गरजवंत – सर्वसामान्य रुग्ण, माझी लोकच माझे विश्व्

म्हणून लातूरची निवड केली. आणि सन 2014 मधे बार्शी
दयानंद गेट जवळील तोडकर कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या मोठ्या छोटेखानी रुग्णालयाने सुरुवात केली.एक दशक लातूर सह परिसरातील तीन-चार जिल्ह्यातील रुग्णावरती अगदी मनापासून उपचार करून कित्तेकना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले. शिवाय

अगदी तरुणपणातच किडनी सारख्या जर्जर त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे डायलिसीस बंद करणाऱ्या डॉ. प्रमोद घुगे यांची वैद्यकीय क्षेत्रातीला यशोगाथा अनन्यसाधारण आहे. यापेक्षाही वाखान्याजोगे सांगायचे झाले तर डॉक्टर होईपर्यंत आणि डॉक्टर झाल्यावर सुद्धा मुळात पहेलवान असलेल्या या माणसाचे कुस्तीप्रेम वा

खेळावरील प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा उपचार करताना त्या रुग्णांच्या सोबतच्या नातेवाईकांना निर्वेसनी – निरोगी राहण्याचे समजावून सांगण्याचे समुपदेशनाचे मोठे काम आजही डॉ. प्रमोद घुगे न चुकता करत आहेत. अशा या हिमालयाच्या उंचीच्या, ज्ञानाने खचाखच भरलेल्या डॉ. प्रमोद घुगे यांचे आयकॉन

हॉस्पिटल आता रुग्णांसाठी आयडॉल ठरत आहे. त्या माध्यमातून आरोग्या संबंधित संपुर्ण सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने आणि येणाऱ्या काळात “किडनी” बदलण्याचे काम आता येथेच
असल्याने रुग्णांची सर्वत्र फिरण्याची वणवण तर थांबणारच आहे. शिवाय त्यांचा वेळही वाचणार आहे.

तेंव्हा येणाऱ्या काळात रुग्णांसाठी आयकॉन आयडॉल तर राहणारच आहे परंतु त्यामुळे लातूरच्या वैभवात नक्कीच भर पडली असल्याचे नाकारता येणार नाही हे नव्कीच….!

Recent Posts