महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – आजपर्यंत मराठ्यांचे अनेक नेते पाहीले पण मराठ्यांच्या हिताचे उघडपने निर्णय घेणारे रक्ताचे एकमेव नेते तुम्हीच मा. एकनाथ भाई साहेब ( Eknath Shinde ) एकनाथ संभाजी शिंदे तुम्हीच फक्त.. साहेब एकदा फक्त मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा व मराठयांना कायम
टिकणारे आरक्षण द्या.. हा मराठा समाज तुम्हाला पर्मनंट मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राजकीय क्षेत्रासह विवीध क्षेत्रातीला अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लातूर
मधील मराठा समाजाच्या अनेक प्रश्नावर आणी राज्यातील विविध प्रश्नावर सडेतोड, स्पष्ट भूमिका मांडणारे लातूर शिवसेनेचे लातूर जिल्हा महानगर प्रमुख ऋषिकेश कदम यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवसेना लातूर जिल्हा महानगर प्रमुख ऋषिकेश कदम
यांनी आपल्या पोस्ट मध्ये आजपर्यंत मराठ्यांचे अनेक नेते पाहीले पण मराठ्यांच्या हिताचे उघडपने निर्णय घेणारे रक्ताचे एकमेव नेते तुम्हीच मा. एकनाथ भाई साहेब ( Eknath Shinde ) एकनाथ संभाजी शिंदे तुम्हीच फक्त.. साहेब एकदा फक्त मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा व मराठयांना कायम टिकणारे आरक्षण द्या.. हा
मराठा समाज तुम्हाला पर्मनंट मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही.. तुमचे आवडलेले काम: १) पहिल्याच कॅबीनेट मध्ये घेतलेला सुप्रीम कोर्टात न टिकलेल्या आरक्षणातून लागलेल्या विद्यार्थांना तुम्ही अधिसंख्य पदे काढूण 3000+ जास्त मराठा विद्यार्थांना न्याय मिळवून दिलात जे की मागील सरकारने यावर कधी
साधी मीटिंग सुध्दा घेतली नाही. २) सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधि बंद केला होता तो सुध्दा तूम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये निर्णय घेईन सुरु केलात. ३) मराठयांना ओबीसीच्या सर्व सवलती लागू करण्याचा GR काढलात.. त्यांची अंमलबजावनी व्हावी ही अपेक्षा. महाराष्ट्र राज्याचे
लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आपणास दीर्घायुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा दिल्या आहेत.