उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन मधील घडलेली घटना अंधश्रद्धेतून झाली नाही

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / विवेक जगताप ) – उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन मधील घडलेली घटना अंधश्रद्धेतून झाली नाही, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी दिल्याच्या बातम्या आणी चर्चा होत असताना दिसून येत

आहेत पण हा सर्व प्रकार अंधश्रद्धेतून झाला नाही, असे उदगीर SDOP असलेले दिलीप भागवत यांनी स्पस्ट केले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन येथील एका अधिकाऱ्याने चारचाकी गाडी घेतल्याच्या आनंदात या अधिकाऱ्याने सर्व पोलीसांना स्नेहभोजन देण्यासाठी हे बोकड कापले आहे, पण या सर्व घटनेना वेगळे स्वरूप

देऊन अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे भासवले जात आहे. लातूर पोलीस आपल्या कार्यातून लोकांच्या मनात जागा केली आहे. मागील वर्षभरात लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनने कौतुकास्पद आणी धाडसी कारवाया केल्या आहेत. तरी लोकांनी या अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन खाकी फाऊंडेशन आणी महाराष्ट्र खाकी न्यूज करत आहे.

Recent Posts