महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरच्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते सुरत शहावली दर्ग्यास चादर अर्पण करून करण्यात आली. आयोध्येत प्रभू रामचंद्राचे
भव्य मंदिर व्हावे हे हजारो वर्षांपासून पाहिलेले स्वप्न 22 जानेवारी रोजी सत्यात उतरत आहे. यानिमित्ताने देशात मोठा आनंद उत्सव साजरा होत आहे तेव्हा रामभक्तानी, जनता घरोघरी दीपावली साजरी करत आहेत. तर देशातील प्रत्येक मंदिरात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात लातूरचे
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरच्या वतीने थेट प्रक्षेपण, स्वच्छता मोहीम, राम सीता वाटिका, यज्ञ-होमहवन, रामरक्षा पाठ, भजन संध्या, महाआरती, दीपोत्सव, महाप्रसादाचे अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांची सुरवात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हजरत सुरत शहावली
दर्गा येथे चादर अर्पण करून करण्यात आली.
श्री सिद्धेश्वर व सुरत शहावली यांचे नाते सर्वश्रुत आहे. दर्गा उत्सवाच्या वेळी मंदिर तर्फे चादर अर्पण करणे तर मंदिरच्या यात्रेवेळी दर्गा कमिटीच्या वतीने नारळ अर्पित करण्याची शेकडो वर्षांची आहे. अश्या परंपरेमुळे लातूरची एकात्मता टिकून आहे. हाच परंपरेचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे असे विक्रांत गोजमगुंडे म्हणाले.