लातूर तालुक्यात आत्ता पर्यंत 157 कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी- मराठा जातप्रमाणपत्रांचे वाटप

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर तालुक्यातील  15 गावात कुणबी, मराठा -कुणबी, कुणबी- मराठा नोंदी आढळल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या निर्देशानुसार 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबविली त्यात 50 ऑनलाईन प्राप्त अर्जाची छाननी करून 25 जणांना

जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आज (20 जानेवारी ) पर्यंत एकूण 157 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित अर्जावरची कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे – विरोळे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या नागरिकांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे

समितीचा दि. 12/01/2024 रोजी झालेल्या लातूर जिल्ह्याच्या दौ-यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार लातूर तालुक्यातील मौ. कोळपा, मांजरी, हिसोरी, खुंटेफळ, खंडाळा, खुलगापूर, कासारगाव, पिंपळगाव आंबा, एकुरगा, मुरुड अकोला, पिंपरी आंबा, सावरगाव, रामेश्वर, वाडीवाघोली व महमदापूर या एकूण 15 गावांमध्ये दवंडी

देवून कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांना दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दिनांक 17/01/2024 व दि. 18/01/2024रोजी विशेष मोहीम राबवून ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र मागणीचे कोरे अर्ज नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात

आले असून त्यापैकी महाईसेवा केंद्रांमार्फत एकूण 50 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून सदर अर्जाची छाननी केली असता त्यात मौ. मांजरी – 5, खुंटेफळ – 4, एकुरगा -12, वाडीवाघोली – 4 असे एकूण 25 कुणबी प्रमाणपत्र संबंधित नागरिकांना वितरित करण्यात आले असल्याची माहिती लातूर उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

Recent Posts