गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयात येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

महाराष्ट्र खाकी ( गोंदिया / विवेक जगताप ) – गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन- 2024 मध्ये राष्ट्र पुरुष /

थोर व्यक्ति, संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे पोलीस अधिक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

करण्यात आले. .तद्नंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर, योगिता चाफले तसेच पोलीस अधिकारी आणी अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते. .

Recent Posts