महाराष्ट्र खाकी ( अ. नगर / विवेक जगताप ) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम चितळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालय सावेडी अहमदनगर या ठिकाणी धान्य वाटप. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधील युवा आणी सक्रीय असलेले शुभम चितळकर यांनी आणी त्यांच्या मित्रपरिवाराने शहराचे
आमदार संग्राम भैया जगताप यांचा आदर्श समोर ठेवून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनावश्यक खर्च टाळून शहरातील सवेवाडी येथील मूकबधिर विद्यालयात तील विद्यार्थ्यां सोबत वाढदिवस साजरा केला आणी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वास्तू भेट देऊन शुभम चितळकर यांच्या वाढदिवस साजरा केला,
शुभम चितळकर यांच्या या कार्याचे शहरात कौतुक होत आहे आणी त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे . मा. आमदार अरुणकाका जगताप आणी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी शुभम चितळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वारेनगरसेवक निखिल वारे , जिल्हाध्यक्ष इंजि.केतन क्षीरसागर, युवा नेते
सागरदादा गुंजाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव दादा ढाकणे, युवा नेते बाली शेठ बांगरे, युवा नेते गणेश भाऊ आनंदकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष शाहनवाजभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगेश शिंदे, कृष्णा शेळके, शिवम कराळे, सदाशिव खेंडके, किरण चितळकर, सुशील चितळकर, रामदास चितळकर, आकाश लोंढे, सोहेलभाई शेख, प्रकाश बनसोडे , विशाल खरात, जुबेर पिंजारी आणी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते