महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – जपानच्या ‘कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली या बद्दल आमदार अभिमन्यू पवार आणी त्यांचे चिरंजीव परीक्षित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना जपानच्या ‘कोयासन विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. सुमारे 1200 वर्षांचा समृद्ध वारसा असलेली जपानमधील कोयासन विद्यापीठाच्या 120 वर्षांच्या इतिहासात देशाबाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले असून, अशी पदवी मिळवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात मंगळवारी हा पदवीप्रदान सोहळा झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास औसा मतदार संघाचे आमदार आणी त्यांचे चिरंजीव परीक्षित पवार उपस्थित राहिले आणी या सुवर्णक्षणांचा साक्षीदार झाले आणि सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मानद डॉक्टरेटसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.