विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता सातत्यपूर्ण अभ्यास, भरपूर सराव, स्वतःवर आणि IIB वर विश्वास हाच यशाचा राजमार्ग – प्रा. नितीन बानूगडे पाटील

महाराष्ट्र खाकी ( नांदेड – लातूर / प्रतिनिधी ) – देशात आणि राज्यात डॉक्टर, इंजिनिअर घडवण्यात वेगळा ढसा निर्माण करणाऱ्या दशरथ पाटील यांच्या महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी “विजयी भव:” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या

कार्यक्रमात आयआयबी च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण, 11 वि करीता सात कोटींची शिष्यवृत्ती आणि बक्षिसे, पुणे कॅम्प येथे नवीन आयआयबी ची आठवी शाखा, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे JEE ची सुरुवात, आता सर्वच शाखांमध्ये NEET आणि JEE उपलब्ध, इयत्ता 12 वी करिता 24 व 31 डिसेंम्बर

रोजी फास्ट परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. नांदेड येथील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात सकाळी तर लातूर येथे दिवानजी मंगल कार्यालयात सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशासह जगभरात आपल्या विशेष वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेले प्रेरणादायी वक्ते प्रा.

नितीन बानूगडे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आयआयबी ने या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की प्रेरणा मिळेल आणि तणाव न ठेवता अभ्यासाकडे वळतील असे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी डॉक्टर बनण्याचा निर्धार केला असून जोमाने अभ्यासाला

लागणार असल्याचे सांगितले. भीती न बाळगता सातत्यपूर्ण अभ्यास, भरपूर सराव, स्वतःवर आणि आयआयबी वर विश्वास हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रा. नितीन बानूगडे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की माघार न घेणे आणि अविरत पणे मेहनत हेच यशाचे रहस्य असून

त्याप्रमाणे वाटचाल केली तर डॉक्टर बनण्याचा तुमचा निर्धार सार्थ ठरेल असेही ते म्हणाले. भव्यदिव्य कार्यक्रम यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तसेच टीम आयआयबी चे सर्व शिक्षक व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Recent Posts