निलंगा तालुक्यातील ओंकार शुगर्सकडून ऊस उत्पादकांना 2700 रूपयांचा पहिला हप्ता जाहीर, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक भाव

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्याला व प्रगतीला प्राधान्य देत सुरु करण्यात आलेल्या डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार शुगर्सकडून चालू गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या व येणार्‍या उसाला कारखान्याकडून प्रती टन 2700

रूपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यात ही सर्वाधिक उचल आहे. ज्या शेतकर्‍यांनी ऊस गाळपास दिलेला आहे त्या शेतकर्‍यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ.

शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात आलेला होता. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा कारखाना बंद पडलेला होता. शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देत व त्यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करून हा कारखाना ओंकार शुगर्स यांच्या माध्यमातून

सुरु केलेला आहे. कारखाना सुरु झाल्यानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर हा कारखाना केवळ शेतकर्‍यांच्या हिताला आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देईल अशी ग्वाही देऊन या कारखान्यात कोणत्याही प्रकारचे राजकारणात करण्यात येणार नाही असा विश्वास दिला होता. आ. निलंगेकर यांनी आपला शब्द पाळत कारखाना

विनाराजकारण यशस्वीपणे चालविण्यास कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांना मदत केलेली असून केवळ आणि केवळ शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचे प्रयत्न या माध्यमातून केलेले आहेत. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार शुगर्सचा आता दुसरा गळीत हंगाम सुरु झालेला असून

कारखान्याला ऊस देणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे कारखाना जास्तीत जास्त ऊस गाळप करत असून ज्या शेतकर्‍यांनी गाळपास ऊस दिला आहे व आगामी काळातही देणार आहेत त्या शेतकर्‍यांच्या ऊसास प्रती टन 2700 रूपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच सदर रक्कम ऊस दिलेल्या

शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम प्रतिकुल परिस्थितीत देखील यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील  व कारखाना प्रशासन प्रयत्नशील असून कारखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक ऊसाचे गाळप वेळेवर होईल असा विश्वास आ. संभाजी

पाटील निलंगेकर यांनी दिलेला असून कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी व शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करावे असे आवाहन केलेले आहे.

Recent Posts