टीम इंडियाच्या पराभवावर मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या पोस्ट मुळे विलासराव देशमुखांच्या राजकीय चिमटा्यांची आठवण

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – ऑस्ट्रेलियन संघाची ED कडून सलग 6 तास चौकशी….हेड, वॉर्नर सहित इतर 6 खेळाडूंचा भारतीय संघात प्रवेश… वॉर्नरला उपकर्णधार पद बहाल… अतिविश्वसनीय सूत्रांची माहीती क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मधील पराभवाने दुःखी झालेल्या क्रिकेट चाहत्यांच्या

चेहऱ्यावर हसू यावे यासाठी लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी एक जनहितार्थ पोस्ट केली आहे. गोजमगुंडे यांच्या या पोस्ट वरून तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजकीय मिशक्किल टिप्पनी आणि राजकीय चिमटे घेण्याची लातूर करांना नक्कीच आठवण झाली, अहमदाबादच्या नरेंद्र

मोदी स्टेडियमवर अतिविश्वसनीय सूत्रांची माहीती क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मधील पराभवाने दुःखी झालेल्या क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू यावे यासाठी जनहितार्थ जारी..च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावा केल्या होत्या. परंतु, ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या दमदार शतकाच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव

कोरलं. टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत असताना सामान्य लोक, कलाकार आणि राजकीय नेते मंडळी प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त होत असतानाच लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी टीम इंडियाच्या

पराभवावर मजेशीर आणि राजकीय हेतू साधत  (मिश्किल टिप्पनी ) सोशल मीडियावर एक पोस्ट आणि इमोजी शेअर केले, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये ” ऑस्ट्रेलियन संघाची ED कडून सलग 6 तास चौकशी….हेड, वॉर्नर सहित इतर 6 खेळाडूंचा भारतीय संघात प्रवेश… वॉर्नरला

उपकर्णधार पद बहाल…
यावर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर बी सी सी आय अध्यक्षांनीच सविस्तर चौकशी करून पुढील ट्वेंटी ट्वेंटी मलिकेआधी निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.- अतिविश्वसनीय सूत्रांची

माहीती क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मधील पराभवाने दुःखी झालेल्या क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू यावे यासाठी जनहितार्थ जारी..”  असे म्हणाले आहेत. विक्रांत गोजमगुंडे हे लातूर मधील सक्रीय, अभ्यासू, जागरूक राजकारणी आणि लातूरच्या जेनतेच्या मनात आपल्या कार्यातून स्थान निर्माण केलेल महापौर आहेत.

विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय जीवनात विरोधकाना आपल्या भाषणात किंवा इतर माध्यमातून राजकीय चिमटे घेत हसवत आपला विरोध आणि आपले मत वेक्त करत असल्याचे बरेचदा पहायला मिळाले, आता विलासरावांचा हा गुण त्यांच्या सानिध्यात आणि त्यांचे भाषणे आयकते, पाहत मोठे झालेले लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घेतला आहे असे या पोस्ट मुळे दिसून येत आहे.

Recent Posts