महाराष्ट्र खाकी (पुणे / प्रतिनिधी ) – जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी (OBC) समाजाच्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. कदाचित ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून सरकारचा भाग आहे हे विसरले वाटतं.
कारण ते महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या तीन न्यायमूर्तीच्या समितीवर, न्यायमूर्ती शिंदे समितीवर, न्यायमूर्ती गायकवाड आयोगावर, राज्य सरकारच्या कामकाजावर, नामदार छगन भुजबळ यांनी कडाडून टीका केली. छगन भुजबळ हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत.
सरकारचा एक भाग आहेत. आणि तेच राज्य सरकारवर कडाडून टीका करतात. हे मोठे आश्चर्य आहे. जर त्यांना राज्य सरकारच्या भूमिका, सरकारचे ध्येय, धोरण, सरकारचे कामकाज आवडत नाही. तर ते राज्यसरकार मधून बाहेर का पडत नाहीत ? आणि ते स्वतः सरकारचा घटक असल्यामुळे ते नेमक्या कोणत्या राज्य सरकारवर
टीका करतात ? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला आहे. आणि भुजबळ राज्यसरकारमध्ये असून जर राज्यसरकारवरच कडाडून टीका करत असतील तर मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना सरकारमधून का काढून टाकत नाहीत. नेमकं भुजबळ कुणाला सांगत आहेत.
आणि नेमक्या कोणत्या राज्य सरकारला इशारा देत आहेत ? असा प्रश्न निर्माण होतो. याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ, व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सर्व मिळून महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढत आहेत. असाच त्याचा अर्थ होतो. असाही आरोप डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला. पण लक्षात ठेवा.
आता असं वेड्यात काढणं लवकरात लवकर बंद करा. खर बोला. जनता अता हुशार झाली आहे. तुम्ही अशा पद्धतीने ऐकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यान रडल्यासारखे करायचं. असं जर केलं आणि जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. तर आता जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही डॉ.
शिवानंद भानुसे यांनी दिला. ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की तुम्ही जर भुजबळांना पाडणार असाल तर आम्ही 117 मराठ्यांचे आमदार पाडू. त्यावर आमचं म्हणणं आहे की जर येत्या अधिवेशनात सर्वच आमदार मराठा आरक्षणावर बोलले नाही तर आम्हीच भुजबळांसह सर्वानाच पाडू. उगाच तुम्ही जातिवाद करू नका. महाराष्ट्र
हे पुरोगामी राज्य असून येथे धर्मभेद, जातीभेद करू नका. हा शिव,फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे जाणीवपूर्वक जाती- जातीत तेढ निर्माण करू नका. नाहीतर याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.