API महेश लांडगे यांना महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार 2023 प्रदान

महाराष्ट्र खाकी( नांदेड / प्रतिनिधी ) – दि. 05 नोव्हेंबर 2023 रविवार या दिवशी पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नारायण काळबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय लीलावती सतीश आव्हाड फार्मसी कॉलेज खरब,

खंडगाव या ठिकाणी घेण्यात आले, सदर कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून निमंत्रित 80 कवींना बोलावण्यात आले. संमेलन अध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे, भैरवनाथ कानडे, नारायण गायकवाड, जयश्री गायकवाड, बंटी सेठ, शंकर पाटील लुटे, पार्थ गायकवाड, रजाक शेख, रविंद्र गिमोणकर,भालचंद्र नाईक, विलास सिंदगीकर,

गुलाबराजा फुलमाळी, एपीआय (API) महेश लांडगे,  राजाभाई सूर्यवंशी,  सत्येंद्र राऊत, पंकज गायकवाड, बोबडे, केराबाई गायकवाड, तसेच सर्व प्रमुख  पाहुण्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजक संभाजी भुजंगराव गोंडाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. पंचवटी बहुउद्देशीय

सेवाभावी संस्थेचे कार्य ध्येयधोरण हे लहान मुलं, महिला, युवक ,वयोवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ  यांच्यासाठी ही संस्था कार्य करत असते. नवोदित कवी कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व ज्यांचे अतुलनीय कार्य आहे त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठीच वाढदिवसाच्या निमित्ताने साहित्यिकांची वैचारिक मांदियाळी बोलवण्यात

आली. नारायण गायकवाड यांच्या जीवनावर आधारित पंचवटी गोंडाळे/ जाधव लिखित काजवा एक संघर्ष कथा या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संस्थेच्या वतीने नारायण गायकवाड यांना महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कवी कवयित्रींना महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सपोनि महेश लांडगे, प्रा.विनायक धानोरकर, कल्याणकर राऊत, यशवंत पगारे, गोविंद लहाने, नागोराव कोंम्पलवार, श्रीराम घडे, रवींद्र गिमोणकर, सौ.अनुराधा वायकोस, राणी चोपडे, ज्योती

देशमुख,  परविण शेख, हेमा लांजेकर, अपर्णा नैताम, एड. वर्षा जाधव, जयश्री पवार, लता शेंदरे, , रजनी कुलकर्णी, उषा नळगिरे, अमिता बच्छाव, संगीता रामटेके, दीपमाला खडके या सर्वांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी, प्रमाणपत्र, देऊन सन्मानित केले.भविष्यातही ही संस्था मुलींसाठी महिलांसाठी त्यांच्या समस्यांवर काम करणार

आहे. सामाजिक वैचारिक विविध शिबिरांच्या माध्यमातून महिला मार्गदर्शन करून सक्षमीकरणाचे उपक्रम हाताळण्याची ग्वाही संस्थेच्या अध्यक्षा पंचवटी गोंडाळे/ जाधव यांनी दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये चंद्रकांत  वानखेडे म्हणाले पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यासारख्या सामाजिक संस्था पुढे आल्या तर निश्चितच

दुर्लक्षित घटक प्रकाशात येईल. माणुसकीची बीज पेरली जातील आणि नक्कीच उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडेल. अध्यक्षीय भाषणानंतर पहिल्या सत्राचा समारोप करून सर्व कवी कवयित्रींनी भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारच्या सत्रात गुलाबराजा फुलमाळी यांच्या मनमोहक सूत्रसंचालनात सामाजिक, वैचारिक ,शैक्षणिक, नाती

गोती, शेती मातीच्या भारदार कविता सादर करण्यात आल्या. यावेळी मरीबा घोरपडे, संदीप काळे, गणपत घोरपडे, संदिप काळे, शेषराव राठोड, भास्कर चव्हाण, अनिता दत्ता गायकवाड, धीरेंद्र विनायते,मा व्यंकट पा.गवते मा मगर सर,मा केंद्रे सर मा प्रीतम गवाले, मामा गायकवाड,मा नरसिंग घोडके, तसेच सर्व शिक्षक आणि प्राध्यापक यांनीही हजेरी लावली. सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Recent Posts