राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली

महाराष्ट्र खाकी (छत्रपती संभाजी नगर / विवेक जगताप ) – सलग नऊ दिवस बेमुदत उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने 2 नोव्हेंबरच्या रात्रीपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री लातूरचे

आमदार अमित देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. मराठा समाजाला सरसकट 50% च्या आत OBC प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सलग 17 दिवस उपोषण केले. हे उपोषण स्थगित केल्यानंतर चाळीस दिवसानंतर त्यांनी

पुन्हा सलग नऊ दिवस बेमुदत उपोषण केले .या उपोषणादरम्यान काही दिवस त्यांनी पाणीही न पिल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या दरम्यान राज्य सरकारने त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितल्याने झालेल्या चर्चा अंती 2 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांनी उपोषण पुन्हा स्थगीत

केले होते. त्या दिवशीपासून ते छत्रपती संभाजी नगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भेतीत अमित देशमुख म्हणाले कि मनोज जरांगे पाटील यांनी आवश्यकतेनुसार नियमित औषधोपचार घ्यावेत, आराम करावा, काळजी घ्यावी असे सांगून त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत बरी व्हावी अशा शुभेच्छा आमदार अमित

देशमुख यांनी दिल्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचे सांगून राज्य आणि केंद्र शासनाने आता वेळ न घालवता लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. आणि राज्यातील सामाजिक सलोखा कायम राहणे अत्यंत

आवश्यक आहे. त्यामुळे, सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत  यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Recent Posts