महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर जिल्ह्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वात “मेरी माटी मेरा देश” हा अभिनव उपक्रम सेल्फी विथ माटी च्या माध्यमातून 5000 सेल्फी लातूर जिल्हा वकील मंडळ, दयानंद महाविद्यालय, व राजश्री शाहू महाविद्यालय येथून संकलन करून
अनोख्या पद्धतीने राबवण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालय आणि नेतृत्वाला प्रभावित होऊन आणि आदर्श मानून मागील कित्येक काळापासून भाजपात कार्य करणारे लातूर भाजपामधील अभ्यासू, आक्रमक, प्रभावी युवा संघटन असलेले आणि अत्यंत कमी कालावधीत आपल्या अनोख्या पद्धतीने आंदोलन
करून राज्याचे आणि जनतेचे लक्ष केंद्रीत करून, त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर कौतुकास पत्र ठरलेले लातूर शहर जिल्ह्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश गोमचाळे यांनी महाराष्ट्र भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल
लोणीकर यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्ह्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वात “मेरी माटी मेरा देश” हा अभिनव उपक्रम सेल्फी विथ माटी च्या माध्यमातून 5000 सेल्फी लातूर जिल्हा वकील मंडळ, दयानंद महाविद्यालय, व राजश्री शाहू महाविद्यालय येथून संकलन करून राबवण्यात आला .
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र बोकन, आकाश बजाज शीतल पाटील,शितल औसेकर,प्रेम मोहिते,संतोष तिवारी,पांडुरंग बोडके,हरिकेश पांचाळ, अरुण जाधव,आकाश पिटले,राहुल भुतडा,किशोर कवडे,यशवंत कदम,सचिन जाधव आदींनी परिश्रम घेतले