महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रतिनिधी ) – लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपल्या कार्यातून आणि कारवायातून जिल्ह्यातील अवैद्य धंदे करणाऱ्यानां भर हिवाळ्यात घाम फोडला आहे. जिल्ह्यातील मटका, जुगार तर सोमय मुंडे यांनी जवळ जवळ बंद केला आहे. आता सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील गुटखा विक्री आणि
निर्मिती करणाऱ्याकडे लक्ष दिले आहे असे दिसत आहे कारण सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात जिल्ह्यातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट गुटखा , सुगंधित तंबाखू , गुटखा
बनवण्याची मशीन , सुपारी , मॅग्निशियम पावडर , कत्था पावडर , विमल पानमसाला व रिकामे रॅपर्स , गुटखा लेबलिंग पॅकिंग उपयोगी इतर साहित्य असे 1 लाख 94 हजारांचा बनावट गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.26) रात्री करण्यात आली . पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की,
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे अवैधरित्या, मानवी शरीरास अपायकारक बनावट गुटखा तयार करून त्याची पॅकिंग करून विक्री करत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीची शहनिशा व खात्री करून परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांनी पथकासह महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर औरद शहाजणी पोलीस
स्टेशन हद्दीत दुर्गम भागात झाडीमध्ये तयार केलेल्या एका पत्र्याच्या शेड मध्ये चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर गुरुवारी (दि.26 ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अडीच किलोमीटर पायी चालत जाऊन धाड टाकली त्यामध्ये गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, वेगवेगळ्या प्रकारचे कच्चे मटेरियल तसेच बनावट तयार
केलेला विमल पान मसालाच्या गोन्या इत्यादी साहित्य असे 1,94,566/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि श्रीनिवास गणपतराव शिवणे, वय 27, वर्षे , राहणार औराद शहाजनी,तालुका निलंगा. अभिषेक कालिदास बिराजदार, वय 24 वर्षे, राहणार औराद शहाजनी, तालुका निलंगा या दोन आरोपी विरुद्ध औराद
शहाजनी पोलीस स्टेशन येथे गुरन. 240/2023 कलम – 188, 272, 273, 328, 34 भादवी व अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 अन्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस
उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार अनिल जगदाळे, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, बाळू कांडनगिरे, चालक चव्हाण तसेच पोलीस स्टेशन निलंगा येथील पोलीस अमलदार बालाजी सोमवंशी, जीवने यांनी केली आहे.