महाराष्ट्र खाकी (मुबंई / विवेक जगताप ) – मराठा समाजाविषयी आणि आरक्षणविषयी सतत गरळ ओकणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची आज तोडफोड करण्यात आली. मुबंईतील परळ येथील क्रिस्टल टॉवरखालीखाली उभी असलेली वकील गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे एक
मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. आता या मराठा बांधवांचे मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी फोडाफोडीच समर्थन केल आहे “गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडणाऱ्या बांधवांचं आम्ही समर्थन करतो असही महेश डोंगरे पाटील म्हणाले आहेत . कोणावरही गुन्हा दाखल करण्यात येवू नये. गुणरत्न
सदावर्ते हा गरळ ओकण्याच काम करतोय. आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याचा बोलविता धनी कोण आहे आम्हाला माहिती आहे, असे महेश डोंगरे पाटील म्हणाले आहेत.