महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखाचा कारभार शांत आणि अनुभवी आणि कारवाईत सुपरफास्ट असलेले पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्याकडे आल्या पासून लातूर जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशन मधील वेगवेगळे आणि गंभीर गुन्हे सुपरफास्ट पद्धतीने उघडकीस
येत असतात दिसून येत आहेत. या मुळे जिल्ह्यातील नागरिक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या कार्याचे कौतुक आणि समाधान वेक्त करत आहेत. LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे लातूर पोलीस दलात त्यांची वेगळी छाप आणि सुपर कॉप अशी इमेज निर्माण झाली आहे.
LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी मोटार सायकल चोरांना पकडून आणखीन एक गुन्हा उघडकीस आणला आहे. ( LCB) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस
अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते . हे विशेष पथके गुन्ह्याची माहिती घेत असताना दि. 23/10/ 2023 रोजी
(LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश मधुकर चव्हाण नवीन रेनापुर नाका परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने हे पथक तात्काळ नवीन रेनापुर नाका परिसरात पोचून रोडवर हिरो होंडा स्प्लेंडरसह थांबलेल्या
इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव ऋषिकेश मधुकर चव्हाण वय 23 वर्ष, राहणार नांदगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भात विचारपूस केली असता सांगितले कि, ही स्प्लेंडर मोटर सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून
चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन साथीदार शंभुराजे सतीश महाजन, वय 24 वर्ष, राहणार शिराढोण, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. यांच्यासोबत मिळून मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी लातूर
शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर 5 अशा मिळून एकूण सहा विविध कंपनीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 2 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील मोटार सायकल
चोरीचा एक , एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे व औसा पोलीस स्टेशनला दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस स्टेशनचे
पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही कामगिरी (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी पार पाडली आहे .