समाजातील गोरगरीब जनतेची सेवा हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे – देविदास काळे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – समाजातील गोरगरीब जनतेची सेवा हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे. भाजपा हा खर्‍या अर्थाने गरीबांचा पक्ष आहे. तरीही या पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. हा पक्ष मुस्लीमद्वेषी आहे असा अपप्राचार केला जात होता. पंरतु खर्‍या अर्थाने विचार केला तर संजय गांधी निराधार

योजनेचा लाभ सर्वाधिक याच समाजाला मिळवून देण्याचे कामही भाजपानेच केलेले आहे. आजही भाजपा युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून लोकसेवेबरोबरच गरीबांना न्याय देण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून याचा सर्वाधिक लाभ निराधारांना होत आहे. त्यामुळे लोकसेवेसाठी आयोजित

केलेले संजय गांधी निराधार योजनेचे शिबीर हे प्रशंसनीय कार्य आहे असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले. यावेळी ते प्रभाग क्र.18 मधील माताजी नगर येथील भाजपा मा. नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या संपर्क कार्यालय परिसरात आयोजित शिबीरात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला

संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष शिवसिंह शिसोदिया, भाजपा युवा मोर्चाचे मा. शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, कव्हा येथील उपसरपंच किशोर घार, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य कमलाकर डोके, दशरथ सलगर, विजय अवचारे, प्रमोद गुडे, कल्पनाताई बावगे, लताताई घायाळ, दिपमाला तुपकर,

मुन्‍ना हाश्मी, संजय गिर, विवेक वाजपाई, अनंत कोरे, शिरीष कुलकर्णी, बालाजी शेळके, शाहूराज भोसले, मोहसिन शेख, गोविंद पांचाळ , सिध्देश्‍वर उकीरडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देविदास काळे म्हणाले की, भाजपा पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य व निराधारांना न्याय देण्याचे करीत आहोत.

आताही या समितीला योग्य अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळालेले आहेत. त्यामुळे यापुढील कालावधीतही पक्षीय समन्वयातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपण करू असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बंडगर यांनी प्रास्ताविकातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संजय

गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 100 नागरिकांची नोंदणी करून कागदपत्रे जमा करून त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. या शिबीराच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी राजेश पवार, प्रविण जोशी, अ‍ॅड. पूनम पांचाळ, आफ्रिन खान, आकाश पिटले, महादेव पिटले,

भिवाजी कांबळे, गणेश पिटले, सचिन जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लाभार्थ्यांसह प्रभाग 18 मधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Recent Posts