महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – राज्यातील कंत्राटी भारती ही महाविकस आघाडीचं (Job Recruitment) पाप असल्याचे सांगत लातूर भारतीय जनता पक्षाच्या वतीनेवतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे ‘महाविकास आघाडी
माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. कंत्राटी भारतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती समोर आणली आहे. सध्याच्या सरकारने त्या बाबतचा जीआर (GR) मागे घेतला असला तरी माहविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर
भाजपच्या कार्यकर्त्यांनी महविकास आघाडी विरोधात आंदोलन केलं. लातूर येथील महात्मा गांधी चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. ‘महाविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरतीपध्दत अवलंबण्यात आली महायुतीचे सरकार आल्यानंतर ही कंत्राटीपद्धत
कशी चुकीची आहे, हे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे ही पद्धत कोणी आणली हे महाविकास आघाडीला विचारले पाहिजे कंत्राटी भरतीची परंपरा ही काँग्रेसच्या काळात सुरू झाली ती शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारच्या काळापर्यंत कायम होती. कंत्राटी भरतीचे धोरण स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना
उद्धव ठाकरे यांनी व त्यांच्या या निर्णयाचे अनुमोदन देणारे शरद पवार यांनी महाराष्ट्रभर राबवले. परंतु आता सरकार गेल्यानंतर या कंत्राटी धोरणाचे खापर भारतीय जनता पार्टीच्या व विद्यमान सरकारच्या माथी मारण्याचा उलटा प्रयत्न धोरण रद्द झाल्यामुळे अपयशी झाला. आज समस्त महाराष्ट्राची ते माफी मागणार का असा प्रश्न निर्माण होतो.
हिच कंत्राटी पद्धत महायुतीचे सरकार आल्यानंतर मोडीत काढण्यात आली. त्याचाच तिळपापड होऊन आज महाविकास आघाडीचे नेते आज बेभान होऊन प्रतिक्रिया देत आहेत, या सर्व गोष्टींची माफी महाविकास आघाडीने मागितली पाहिजे, असा घणाघात महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या आणि लातूर भाजपाच्या महिला नेत्या प्रेरणा
होनराव यांनी केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देविदास काळे, गुरुनाथ मगे , राज्य प्रवक्त्या प्रेरणा होनराव, प्रवीण सावंत , शिरीष कुलकर्णी ,मीनाताई भोसले जी दिग्विजय काथवटे , रागिनीताई यादव ,प्रवीण कस्तुरे,युवा मोर्चाचे गणेश गोमसाळे जी यांच्या यांच्यासह सर्व कार्यकर्ते व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.