महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला असून अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी आज सोमवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या पालकांशी व इतर कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. या घटनेत जखमी
झालेल्या सर्व मुलांवर योग्य उपचार करावेत. औषधांची कमतरता भासू नये. सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आमदार धीरज देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.