लातूर मधील दोन बांधकाम व्यवसायीकांना ( बिल्डरांना ) महारेराचा दणका, घरांची विक्री आणि बँक खाते केली सिल

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) लातूर मधील 2 बांधकाम व्यवसायीकांना (बिल्डरांना ) महारेराने (Maharera) चांगलाच दणका दिला आहे. ग्राहकांना आपल्या बांधकाम प्रकल्पाबाबतची माहिती अपडेट करून देणे गरजेचे मात्र काही बांधकाम व्यवसायिकानी हे काम न केल्याने महारेराने (Maharera) लातूर मधील 2

बिल्डरांना दणका दिला आहे. या बिल्डरांच्या प्रकल्पांचे बँक खाते गोठवण्यात येत असून त्यांना प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्रीही करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय, या प्रकल्पांतील सदनिकांच्या (घरांच्या ) विक्री व्यवहारांची ( Agreement for Sale), आणि खरेदी खताची ( Sale deed) नोंदणीही न

करण्याचे संबंधित उप निबंधकांनाही निर्देशही देण्यात आले आहेत.  जानेवारीत महारेराकडे नोंदवलेल्या 746 प्रकल्पांनी 20 एप्रिलपर्यंत स्थावर संपदा अधिनियमानुसार  प्रकल्पांत पहिल्या 3 महिन्यात  किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, किती पैसे आले, किती खर्च झाले, इमारत आराखड्यात झालेला बदल (असल्यास) इत्यादी

माहितीचा तपशील असलेले प्रपत्र 1,2 आणि 3 संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक होते. याची पूर्तता न करणाऱ्या बिल्डरांना आधी 15 दिवसांची आणि नंतर कलम 7 नुसार प्रकल्पाची नोंदणी रद्द किंवा स्थगित का करू नये अशी गंभीर स्वरूपाची 45 दिवसांची नोटीस महारेराने बजावलेली होती. यालाही

प्रतिसाद न देणाऱ्या लातूर मधील 2 बिल्डरांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा कठोर निर्णय महारेराने घेतला आहे. महाराष्ट्र खाकी आपल्या पुढच्या बातमीत त्या 2 बिल्डरांच्या प्रकल्पाची सविस्तर माहीती प्रकाशित करणार आहोत.

Recent Posts