लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड लिखीत “राजभाषा किसे कहते” पुस्तकाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र खाकी ( पुणे / प्रतिनिधी ) – पुणे येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स काम्प्लेक्स,बालेवाडी येथील स्टेडियम मधे भारत सरकार च्या गृहमंत्रालया ने आयोजित केलेल्या हिंदी दिवस निमित्य तिसरे अखिल भारतीय हिंदी संमेलन च्या उद्घाटन सत्रामधे लातूर लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट संसद रत्न,राजभाषा समिती भारत सरकारच्या समितीचे

माजी सदस्य,माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेले “राजभाषा किसे कहते है” या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन भारत सरकार चे गृहराज्यमंत्री अजय मिश्रा,राज्यसभेचे उप सभापती हरिवंश , केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री भारती पवार, राजभाषा समिती चे उपाध्यक्ष भर्तहरी महंताब, एमएसएमई चे

राज्यमंत्री वर्मा , गृहमंत्रालय भारत सरकार च्या सचिव अंशुली आर्या, सह सचिव श्रीमती जॉली, या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेल्या राजभाषा किसे कहते है ? हे पुस्तक त्यांनी 2014 ते 2019 या काळात भारत सरकार च्या राजभाषा समिती चे सदस्य या

नात्यांनी केलेल्या कामाच्या अनुभवावरून आणि भारतीय संविधान मधे केलेल्या कायद्याची नियमाची इत्यंबुत माहिती या पुस्तकात दिल्यामुळे हे पुस्तक केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी मधे कामकाज करण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल असा आशावाद पुस्तक प्रकाशन प्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा जी यांनी व्यक्त करुन

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे अभिनंदन करुन खूप शुभेच्छा दिल्या. हे पुस्तक थोडक्यात राजभाषा कशाला म्हणतात हे सांगून सर्व अवश्यक नियमावली या पुस्तकात लिहले आहे. संसदीय समिती , उपसमिती ची स्थापना, सदस्य, आणि कार्यालय सूची. मांडण्यात आले आहे. प्रो. डॉ सुनील गायकवाड यांच्या या

महत्वपूर्ण पुस्तका साठी अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी शुभेच्छा देऊन कौतुक करण्यात आले. या संमेलनाला हजारो लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली. भारतातून विविध राज्यातून हजारो अधिकारी या संमेलना साठी उपस्थित होते. पुणे मावळ चे खासदार श्रीरंगअप्पा बारने, संघ परिवाराचे ब्रिजेश कुंतल, गृहमंत्रालय राजभाषा

विभागाच्या डेप्यूटी डायरेक्टर अभिलाषा मिश्रा,साइंटिस्ट पांडे जी,आदि मान्यवर उपस्थित होते. गुगल प्ले बुक वर पण ई – बुक राजभाषा किसे कहते है? याचे ही प्रकाशन मान्यवर मंत्री अजय मिश्रा और राज्यसभा उपसभापती हरिवंश जी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

Recent Posts