महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवली सराटी गावात गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनासाठी पाठिंबा म्हणून लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथील आदित्य अप्पासाहेब देशमुख हा तरूण गेल्या सहा दिवसापासूंन लातूर तहसिल
कार्यालयसमोर बेमुदत उपोषण करीत आहे. अचानक त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शासकीय सर्वोपचार रूग्णालयामध्ये भेट
देऊन आदित्य देशमुख याच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच त्याला योग्य ते उपचार देण्याचे आदेश संबंधीत डॉक्टर अधिकारी कर्मचार्यांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे, माधवराव गायकवाड, माजी नगरसेवक
बालाजी शेळके, डॉ.निलीमा देशपांडे, डॉ.गजानन हलकंचे, डॉ.आशिष सरवदे, डॉ. भूषण, डॉ.सिंधूताई राठोड यांच्यासह शासकीय सर्वोपचार रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी उपोषणकर्ता आदित्य देशमुख याला आरक्षणाबाबत शासन योग्य ते निर्णय घेईल, परंतु आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.