LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकिले यांच्या कारवाईची दखल घेऊन जिल्हाधिकारी वर्षी ठाकूर – घुगे यांनी घेतली अंमली पदार्थविरोधी समितीची बैठक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरची ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख असून राज्यभरातून विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ, नशा येणाऱ्या औषधांपासून दूर राहून आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा

ठाकूर-घुगे यांनी केले. आज झालेल्या अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठकीनंतर त्यांनी हे आवाहन केले. लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकिले यांनी लातूर शहरात 28 ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करून नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. या मोठ्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी

वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठक घेऊन प्रशासनाला सूचना आणि माहीती दिली. औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाऊट प्रिस्क्रिप्शन’ तत्वाचे पालन करावे. कोणालाही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विक्री करू नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच नियमाची कठोर

अंमलबजावणी होण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. लातूर येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी पालक आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शहरामध्ये ठेवतात. त्यामुळे कोचिंग क्लासचे संचालक, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पालकत्वाची भूमिका

घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याच्या सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये परिपाठानंतर नियमितपणे विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करून त्यांना अंमली पदार्थांच्या

दुष्परिणामांची माहिती देण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना द्याव्यात. तसेच धाब्यावर तसेच इतर अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

Recent Posts