महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा (28 ऑगस्ट) सोमवारी लातूर दौरा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या 27 व 28 ऑगस्ट 2023 रोजी दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्रीमती चाकणकर यांचे 27 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता बीड येथून लातूर शासकीय विश्रामगृह येथे

आगमन होईल व मुक्काम. 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी महिला शहर, जिल्हा कार्यकारणीची बैठक होईल. 28 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनसुनावणी

होईल. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. सायंकाळी सहा वाजता धायरी, पुणेकडे प्रयाण करतील.

Recent Posts