महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा, आरोग्य चांगले राहावे, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पोलिसांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे
उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारपासून 27 व्या लातूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा, 2023 चे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या उपस्थितीत सुरुवात
झाली. या स्पर्धेत कबड्डी, फुटबाॅल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हॉकी इतर ऍथलेटिक्स खेळ खेळले जाणार करण्यात आहेत. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा पोलिसांना विरंगुळा मिळावा, नेहमीचे कर्तव्य करताना निर्माण होणारा ताण कमी होण्यासाठी व मनोरंजन म्हणून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तर्फे 27 वी
लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सदरच्या स्पर्धा 19 ऑगस्टपर्यंत पार पडणार असून संपूर्ण लातूर जिल्ह्यातील विविध शाखा व पोलीस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. विविध
पोलीस स्टेशन व विवीध शाखेतील पोलिसांनी यावेळेस शानदार संचालन केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या उपस्थितीत होते. पोलिस क्रीडा स्पर्धा या 19 ऑगस्ट पर्यंत होणार आहेत तर 19 ऑगस्टला या स्पर्धातील विजयी खेळाडूंना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होऊन पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.