Latur police लातूर पोलीस दल अधिक सक्षम व अद्यायवत बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून 24 मोटारसायकली सुपूर्द

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम व अद्यायवत बनविण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून अद्ययावत मोटारसायकलींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 26 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात

आला. या निधीतून प्राप्त झालेल्या 24 मोटारसायकली चार्ली पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन ड्युटी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा पोलीस दलासाठी 24 अद्ययावत मोटारसायकली प्राप्त झाल्या आहेत. या मोटारसायकली भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यावेळी उपस्थित होते.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे