महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत औसा तालुक्यातील 109 गावांमधून गोळा करण्यात आलेली माती आज औसा येथे आणण्यात आली. 109 गावांची माती एका अमृत कलशात एकत्र करून ती दिल्लीला नेण्यात येणार, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे लोकसेवेसाठी आणि देश
सेवेसाठी तत्पर असतात हे वेगळे सांगायची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटका निर्माण होणार आहे. या वाटिकासाठी देशातील सुमारे 7500 तालुक्या मधून 7500 अमृत कलशांद्वारे माती आणि झाडे एकत्रित करण्यात येत आहेत. ही अमृत वाटिका तयार झाल्यानंतर
140 कोटी देशवासियांना एक भारत श्रेष्ठ भारत चा संदेश देईल. या अमृत वाटेकेच्या निर्मितीत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत औसा तालुक्यातील 109 गावांमधून गोळा करण्यात आलेली माती आज औसा येथे आणण्यात आली. 109 गावांची माती एका अमृत कलशात एकत्र करून ती
दिल्लीला पाठवणार आहेत. औसा तालुक्याप्रमाणेच देशातील सुमारे 7500 तालुक्यांमधून 7500 अमृत कलशांद्वारे आलेली माती आणि झाले एकत्रित करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका उभारली जाणार आहे.