लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. पवन लड्डा यांचे महाअरोग्य शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – दिवंगत लोकनेते  विलासरावजी देशमुख यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त  प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर पवन लड्डा यांनी त्यांच्या लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय पद्मादेवी मंदिर रस्ता, बॅक

ऑफ महाराष्ट्र शेजारी, पद्मा नगर, बार्शी रोड, लातूर येथे वाताचे आजार व पोटाचे आजार उपचार शिबीराचे आयोजन केले आहे. लातूर जिल्ह्यात विशेषतः लातूर शहरात डॉ. पवन लड्डा यांचे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. लातूर जिल्ह्यात लातूर ग्रीन वृक्ष टीम च्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य आहे. डॉ.

पवन लड्डा हे डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या हॉस्पिटल च्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात. यावेळेस दिवंगत लोकनेते  विलासरावजी देशमुख यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या दि.14 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात वाताचे आजार सांधे दुखणे, कंबर दुखणे, गुडघा दुखणे, मणक्याचे

आजार, मांड्या आखडणे, टाचा दुखणे, जुनाट वाताचे आजार  संधीवात – आमवात – गाऊट,  सायटिका , टाचदुखी व्हेरीकाेज व्हेन, वारंवार होणारी तीव्र डोकेदुखी
पोटविकार व पचनाचे आजार अपचन, ॲसिडीटी, मलबध्दता, मुळव्याध – भगंदर – फिशर, गॅस्ट्रायटिस
वारंवार हाेणारा मुतखडा या सर्व आजारावर उपचार आणि

तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करावे असे आवाहन डॉ. पवन लड्डा यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी 02382 221364 या नंबरशी संपर्क करावे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे