IPS somay munde पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून पोलीस पाल्यासाठी उद्या रोजगार मेळावा

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी उद्या रविवारी (दि. 13) दयानंद कॉलेज येथील कला शाखेच्या इमारती मध्ये रोजगार मेळावा हाेणार अाहे. लातूर जिल्हा पोलीस आणि जिल्हा कौशल्य विकास कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा हाेणार असल्याची माहित लातूर पोलिस  दला काडून देण्यात आली आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर पोलीस आणि जिल्हा कौशल्य विकास कार्यालय लातूर यांच्या संयुक्त

विद्यमाने लातूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या बेरोजगार पाल्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी शासनाचे विविध महामंडळाच्या वतीने कर्जसुविधा उपलब्ध करणे नोकरी इच्छुक पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करणे यांसाठी रविवारी (दि.13) हा मेळावा सकाळी 9.30 वाजता दयानंद महाविद्यालयातील कला विभागाच्या सभागृहात होणार आहे. तर या रोजगार मेळाव्याचे

आयोजक अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले आहे तर प्रमुख उपस्तिथी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड आणि बालाजी मरे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास लातूर हे उपस्तित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील पोलीस पाल्याना या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Recent Posts