महाराष्ट्र खाकी ( अकोला / विवेक जगताप ) – पोलीस विभागात तपास करत असतांना बरेचशा अडचणी येत असतात. विशेष करून बालकांच्या व महिला संबंधीत गुन्हया मध्ये आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण कमी होते हे प्रमाण वाढविण्या साठी तपासात काय चुका होतात व त्या होवु नये यासाठी दि.11 ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला व अकोला पोलीस दलातर्फे बालकांचे कायदे विषयक कार्यशाळेचे आयोजन सकाळी 10 वाजता निमवाडी पोलीस वसाहत हॉल येथे करण्यात
आले होते. या कार्यशाळे करीता श्रीमती सुवर्णा केवले मुख्य न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय अकोला, श्रीमती शयना पाटील जिल्हा न्यायाधीश – 2 अकोला, संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, योगेश पैठणकर न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला, अँड.संजय सेंगर सर सदस्य महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, अँड अनिता गुरव शिंदे अध्यक्षा बालकल्याण समिती अकोला, श्रीमती वैशाली गावंडे सदस्य बाल न्याय मंडळ अकोला,
राजेश अकोटकर सरकारी वकील अकोला यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थिती होती. पोलिसांकडून तपासात होणा-या चुकांचे निरसन या कार्यशाळेत करण्यात आले तसेच कायदयातील बारकावे नविन झालेले बदल हे सुदधा कार्यशाळेतुन समजावुन सांगीतले. सोबतच स्वःता माननिय न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा केवले मुख्य न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय अकोला यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. मा. सवप घुगे पोलीस अधीक्षक, अकोला स्वागत पर भाषण श्रीमती शयना पाटील जिल्हा
न्यायाधीश- 2 अकोला पोक्सो केसेस राजेश अकोटकर अतिरीक्त सरकारी वकील अकोला श्रीमती वैशाली गावंडे सदस्य बाल न्याय मंडळ अकोला (एस.बी.आर) सामाजीक सर्वेक्षण अहवाल महत्व आणि तांत्रीक आवश्यकता. मा. श्रीमती अनिता गुरव-शिंदे अध्यक्ष बाल कल्याण समीती अकोला. बाल कल्याण समिती व पोलीसांची भुमीका श्रीमती संजीवनी पुंडगे पोलीस उपनिरीक्षक अकोला पोक्सो केसेस मधील अनुभव संजय सेनगर सदस्य बाल हक्क आयोग महाराष्ट राज्य बालक
संरक्षण व काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. अकोला पोलीस दलातील सेशन तपसातील लेखनिक म्हणुन उत्कृष्ट कामगीरी केल्या बददल महीला पोलीस अंमलदार कावेरी ढाकणे पोलीस स्टेशन रामदासपेठ यांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. या कार्यशाळेचे सुत्र संचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी आभार प्रदर्शन केले.सदर कार्यशाळेला सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अकोला शहर विभागातील प्रभारी ठाणेदार तसेच सेशन तपास अधिकारी व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार यांची उपस्थिती होती