IIB चे संचालक प्रा. चिराग सेनमा यांचा 13 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे शासनाच्या ”राष्ट्रीय एकता पुरस्काराने” होणार सन्मान

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूरला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर लातूर पॅटर्न म्हणून लातूरचा सर्वत्र नावलौकिक आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण आणणे आणि त्या यशस्वीपणे राबवून लातुरात शैक्षणिक दर्जा उंचावन्याचे काम आयआयबी इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा यांनी अगदी प्रामाणिकपणे केले आहे. प्रा. चिराग सरांची अत्यंत दर्जेदार अशी टिचिंग पद्धती, अकॅडमीक प्लॅनिंग आणि विद्यार्थ्यांवर त्यांच्या

अध्यापनाचा असलेला प्रभाव यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रा. चिराग सरांना ओळखले जाते. सरांनी जनता दरबारची संकल्पना आणि त्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी त्यांच्या क्षमतेनुसार राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि उपक्रम राबविले. यामध्ये केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापनाचा नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूळ रुजविणे यालाही प्राधान्य दिले. क्लासेस कॅम्पस किंवा वर्गामध्ये स्मार्ट व्हॉच आणि मोबाईल

वापरावर निर्बंध ही संकल्पना पहिल्यांदाच लातुरात राबविली. कोरोना संकटानंतर जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन होता आता आयबीबी इन्स्टिट्यूटच्या नियमांनंतर सध्या विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट फोन वापरण्याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले असून विद्यार्थ्यांचा मोबाईल वापरावर जाणारा वेळ हा अभ्यासाकडे वळला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता झपाट्याने वाढली असल्याचे दिसते. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रा. चिराग सर आपली सामाजिक बांधिलकी

विविध प्रकारे बजावत असतात. यामध्ये सर्वात कौतुकास्पद उपक्रम म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव येथे एचआयव्ही-एड्स बाधित मुलां-मुलींसाठी कार्य करणाऱ्या सेवालय या संस्थेतील सर्व मुलां-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वतः प्रा. चिराग सेनमा यांनी स्वीकारले असून या विद्यार्थ्यांनी भविष्यात दैदिप्यमान यश संपादन करावे असे सरांचे स्वप्न आहे. प्रा. चिराग सरांच्या या सर्वांगीण गुणांचे आणि त्यांच्यातील एका सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या

या कार्याचा इतरांनीही आदर्श घ्यावा या हेतूने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोग आयोगामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये लातूर शहरात येथे विविध नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला चालना देत नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा यांना “राष्ट्रीय एकता

पुरस्काराने” गौरविण्यात येणार आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, रफी मार्ग, नवी दिल्ली येथे 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. चिराग सरांचे विद्यार्थी वर्ग, पालक, शिक्षण क्षेत्रासह सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे