मा. आमदार शिवाजीराव कव्हेकर साहेबांनी JSPM संस्था व MNS बँकेच्या माध्यमातून चौफेर प्रगती साधण्याचे काम केलेले आहे – प्रदीप राठी

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या मोबाईल बँकींग व एटीएम कार्ड सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कव्हेकर साहेबांच्या आग्रहामुळे मी या कार्यक्रमास आलो. आम्ही एक संघर्षशील व्यक्‍तिमत्त्व म्हणून कव्हेकर साहेबांकडे पाहतो. त्यांनी (JSPM) जेएसपीएम संस्था व (MNS) एमएनएस

बँकेच्या माध्यमातून चौफेर प्रगती साधण्याचे काम केलेले आहे. मुळात बँकींग क्षेत्र चालविणे अवघड झाले आहे. बँकेच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व पारदर्शकपणा पाहिजे. बँकेच्या ठेवीचे सरंक्षण करणे हे बँकेचे आद्यकर्तव्य आहे. तसेच बँकेच्या ठेवीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. खर्‍या अर्थाने एमएनएस बँकेसारख्या सहकारी बँकांनी ग्राहक व

सभासद हा केंद्रबिंदू माणून व ग्राहकांच्या ठेवी अबाधित ठेऊन एमएनएस बँकेने राज्यात प्रगती साधण्याचे काम केले असे प्रतिपादन लातूर अर्बन को-आप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांनी केले. यावेळी ते एमएनएस बँकेच्यावतीने आयोजित मोबाईल बँकींग व एटीएम सेवा शुभारंभाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संवदेना प्रकल्प कार्यवाह सूरेशजी पाटील, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, एमएनएस बँकेच्या व्यवस्थापकीय समितीचे प्रमुख अजितसिंह पाटील कव्हेकर, संचालक बाबासाहेब कोरे,

सूर्यकांतराव शेळके, अ‍ॅड.गंगाधर हामणे, प्रदीपराव सोनवणे, विश्‍वास जाधव, रविंद्र कांबळे, सहारा शेख, दिनकर पाटील मसलगेकर, रावसाहेब  पाटील, सुभाषअप्पा सुलगुडले, शिवाजी देशमुख, एमएनएस बँकेचे जनरल मॅनेजर गहिरवार,शाखा व्यवस्थापक गणेश पवार, नितीन सराफ, शिवाजी सूर्यवंशी, प्रविण जाधव,

नंदकिशोर सोनी, अ‍ॅड.पंकज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होेते. यावेळी पुढे बोलताना प्रदीप राठी म्हणाले, सहकारी बँकेच्या प्रगतीवर आरबीआय ने प्रचंड निर्बंध घातलेले आहेत. तरीही राज्यातील सहकारी बँकाचे जाळे कायम आहे. सहकार भारतीच्या माध्यमातून सूरेश पाटील यांचेही काम चांगले आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या

माध्यमातून सामाजिक बांधिलकी सांभाळत बँकेची प्रगती साधण्याचे काम सुरू आहे. बँकींग क्षेत्रासह आयटी क्षेत्रामध्ये भारताचे काम प्रगतीपथावर आहे. स्पर्धेच्या युगामध्ये इंटरनेट बँकींग, मोाबाईल बँकींग, एटीएम सेवा व इतर ऑनलाईन सुविधा देणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रातील प्रगतीसाठी केंद्रात सहकार हे स्वतंत्र्य खाते

निर्माण करण्यात आलेले आहे. सहकार खात्याची सुरुवात जरी असली तर सहकाराअंतर्गत येणार्‍या सर्व संस्था, सोसायट्या यांच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी सहकारी संस्था पुनर्जिवीत करून सहकार चळवळ जोपासण्याचे काम आपण करावे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रांरभी प्रमुख

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  तसेच प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. बँकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल बँकींग व एटीएम कार्ड सेवेचा शुभारंभ अ‍ॅड.गंगाधर हामणे व प्रदीप  सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते एटीएम कार्ड देऊन करण्यात आला.

Recent Posts