जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांची हत्या

महाराष्ट्र खाकी ( सोलापूर / विवेक जगताप ) – सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील केदारवाडी रोडवर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणानंतर रात्री घरापासून शतपावली करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) असे त्यांचे नाव आहे ते सांगली

शहर पोलीस दलात कार्यरत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे  (वय-42 रा. वासूद ता. सांगोला) बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर चंदनशिवे शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी चंदनशिवे

यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये चंदनशिवेयांचा मृत्यू झाला. शतपावली करुन बराचवेळ झाला तरी चंदनशिवे घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत

कुलकर्णी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. चंदनशिवेयांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे

2018 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असताना नऊ कोटींच्या अपहार प्रकरणी निलंबित झाले होते. एका वर्षांपूर्वी चंदनशिवे यांचे निलंबन रद्द झाले होते. त्यानंतर सूरज चंदनशिवे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र आता त्यांच्या हत्यने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Recent Posts