लातूर LCB पाथकांकडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी सह 15 बैल जप्त

महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप ) – लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याना ब्रेक लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) चांगले यश आले आहे. दिवसा गणिक LCB कडून जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाया होताना दिसत आहेत. अशाच एका अवैध

धंद्यावर कारवाई केली आहे. दि. 30 जुलै च्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना LCB पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास अहमदपूर पोलीस स्टेशन येथे पोचले असता पथकाला मिळालेल्या माहितीवरून गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन

थांबून विचारपूस केली असता या वाहनांमध्ये (गोवंश) 15 बैल ज्याची किंमत अंदाजे सात लाख पन्नास हजार रुपये असे गोवंश 15 बैल आयशर टेम्पोमध्ये कोंबून, कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. (आयशर ) वाहन चालकाकडे व सोबत असलेल्या इसमांना पोलिसांनी विचारपूस केली असता

त्यांनी त्यांची नाव 1) सलमान उस्मान शेख, वय 30 वर्ष, राहणार घाटनांदुर तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर. 2) जावेद बुडन शेख, वय 30 वर्ष, राहणार बोरगाव सारणी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. 3) जाकीर अब्दुल अजीज शहा, वय 23 वर्ष, राहणार बोरगाव सारणी, तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर. या

आरोपींनी अवैधरित्या गोवंश ,बैल एकूण 15 बैल (ज्याची किंमत अंदाजे 7 लाख 50 हजार रुपये) अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने आयशर टेम्पो ( किंमत 15 लाख) असा एकूण 22 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे तसेच अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी केली आहे.

Recent Posts