Mahatma gandhi महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रत विधान केलेल्या संभाजी भिडे यांचा विक्रांत गोजमगुंडे यांनी तीव्र शब्दात केला निषेध

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – काही दिवसांनी महात्मा गांधी दहशतवादी होते, सांगत फिरतील. विचारांची ही विकृती शासनाने वेळीच रोखली पाहिजे. लातूर महानगरपालिकेचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या कार्यातून आणि देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर वेळोवेळी तीव्र शब्दात निषेध करत

आले आहेत. काही दिवसापूर्वी महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रत विधान केलेल्या संभाजी भिडे यांचा निषेध केला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे.

यावरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत आणि राज्य भरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून भिडे यांच्या विधानाचा निषेध वेक्त करत आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ट्विट ( पोस्ट ) करून तीव्र निषेध केला आहे. विक्रांत

गोजमगुंडे यांनी आपल्या ट्विट (पोस्ट) मध्ये विचारांची विकृती. ज्यांनी देशास अहिंसेचा मंत्र दिला, स्वातंत्र्यलढा दिला, तुरुंगवास भोगला, जगभर ज्यांच्या सत्याग्रहाचे अनुकरण आजही केले जाते, ज्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते… त्यांच्यावर, त्यांच्या आई वडिलांवर इतक्या खालच्या थरावर बोलून पण काहीच कार्यवाही होणार नाही ? “काही दिवसांनी महात्मा गांधी दहशतवादी होते, सांगत फिरतील”. विचारांची ही विकृती शासनाने वेळीच रोखली पाहिजे. या शब्दात निषेध केला आहे.

Recent Posts