PI सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने कारागृहातून रजेवर सुटून 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुण्यातून केली अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस दलातील सर्वात कार्यक्षम आणि धाडसी पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे आहेत, सुधाकर बावकर यांच्याकडे एखादा गुन्हा तपासासाठी आला म्हणजे त्या गुन्ह्याची जलद गतीने उकल करून आरोपीला

अटक केली होते. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे जिल्ह्यातील घडलेल्या मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात खूप मोठा हात असतो. यांचे नेटवर्क खूप मजबूत असल्यामुळे त्यांना गुन्हेगाराची अचूक माहीती मिळते. सुधाकर बावकर यांनी अशाच प्रकारे एका गुन्हेगाराला पुणे येथून अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. लातूर

शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे 2014 मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी परमेश्वर शंकर जाधव, वय 37 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, सहयोग नगर, रिंग रोड, लातूर, हा 2020 मध्ये चार आठवड्याच्या संचित रजेवर औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, हार्सूल मधून बाहेर पडला

होता. संचित रजा संपल्यावर तो कारागृहात दाखल न होता फरार झाला होता. यासंदर्भात कारागृह पोलिसांनी दिलेल्या फिर्याद वरून आरोपी परमेश्वर शंकर जाधव विरुद्ध विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारागृहातून रजेवर आल्यानंतर तीन वर्षापासून फरार झालेल्या (परमेश्वर

शंकर जाधव) आरोपीचा शोध घेण्याकरिता विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथक तयार करून फरार (परमेश्वर शंकर जाधव) आरोपीचा विविध मार्गाने शोध घेण्यात येत होता. पोलीस पथकाने आरोपी (परमेश्वर शंकर जाधव) वास्तव्य करण्याची शक्यता असलेले विविध ठिकाणी भेटी देऊन

बातमीदार तयार केले , बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून फरार आरोपी परमेश्वर शंकर जाधव हा पुणे येथे राहत असल्याचे पोलीस पथकाला समजले. त्यावरून दि. 28 जुलै रोजी पोलीस पथक पुणे येथे गेले आणि आरोपी परमेश्वर जाधव यास ताब्यात घेऊन विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे आणण्यात

आले. पुढील कार्यवाही करिता मा. न्यायालय लातूर येथे हजर करून त्यास परत औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह हरसुल येथे दाखल करण्यात आले . ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहाय्यक फौजदार विलास फुलारी, पोलीस अमलदार दिनेश हवा, नलवाड यांनी केली आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे