वाहतूक नियंत्रण शाखेचे PI गणेश कदम यांच्या नेतृत्वात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 125 माॅडीफाय सायलेन्सर्स व कर्ण कर्ककश हॉर्नचा वाहतूक पोलिसांकडून चुराडा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर वाहतूक नियंत्रण शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्याकडे आल्या पासून लातूर शहरातील वाहतुकीत कमालीचा बदल दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी आणि

नागरिकाला ट्रॅफिक जाम, कर्ण कर्कश हॉर्न, मॉडिफाय सायलेन्सर चा आवाज बंद करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाता आहेत. लातूर शहरात दुचाकीवरून हवा करत फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची व त्यांना मोटार वाहन अधिनियम कायद्याचा पाठ शिकवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या

मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात वेळोवेळी वाहतूक नियंत्रण शाखेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. मॉडीफाय सायलेन्सरला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांकडून विविध मार्गाने उपाय योजना करण्यात येत आहेत. मॉडीफाय सायलेन्सरचे फोटो काढून पोलिसांना

कळविणाऱ्यांना सवलतीचे कुपन वाटप, ट्राफिक अँबेसिडर तसेच रोटरी क्लब व सेवाभावी संस्थांच्या माध्यमाने जनजागृती, पथनाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही काही अतिउत्साही युवक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करून मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न वापरताना आढळून येतात. अशा मॉडीफाय

सायलेन्सर,कर्णकर्कश हॉर्न वापरणाऱ्या दुचाकीवर कार्यवाही करून वाहतूक शाखेकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. परंतु दंडात्मक कार्यवाही करूनही काही दुचाकीस्वार परत-परत मॉडीफाय सायलेन्सरचा वापर करीत असल्याने वाहतूक पोलिसांकडून ते जप्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस

निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात कार्यवाही करत वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील 3 महिन्याच्या काळात 125 नियमबाह्य मॉडीफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. ते दि. 28 जुलै रोजी त्या 125 नियमबाह्य/ मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न पंचा समक्ष रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आले आणि ते

भंगारात विकून त्यातून मिळालेले पैसे शासनास जमा करण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात या अगोदरही अशाच प्रकारे 150 मॉडीफाय सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर व त्यांच्या पथकाने केली आहे .

Recent Posts