महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदावर चर्चा होणार आहे.महाराष्ट्र काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदी तरुण आणि गतिमान नेतृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्राचे माजी
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आमदार अमित देशमुख काँग्रेस पक्षाचे वैभव परत आणू शकतात असे मत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे वेक्त केले आणि विरोधी पक्ष नेते पदी माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आमदार अमित देशमुख यांची निवड व्हावी यासाठी मत वेक्त केले आहे! .
पावसाळी धिवेशनाला दोन आठवडे बाकी असताना अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षातून बंड करून सरकारमध्ये सामील झाला. मागच्या अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असलेले अजित पवार थेट सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड हे
विरोधी पक्षनेते असतील म्हणून जाहीर केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फूट पडल्यामुळे काँग्रेस हा विधिमंडळातील विरोधी पक्षांमधील सर्वात मोठा बनला आहे. महाराष्ट्र कॉग्रेसने सक्षम चेहऱ्याची निवड करावी असा चेहरा असावा जो सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही स्वच्छ प्रतिमा आणि
तत्वात कुठलीही तडजोड नाही असा चेहरा आता राज्याला विरोधीपक्ष नेता म्हणून हवा आहे असे सामान्य नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून असे मत वेक्त होत आहे.