Latur police अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरु असलेल्या जुगारावर LCB पोलिस पथकाचा रात्री उशिरा मारली धाड

महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात भगतसिंग पवार याच्या शेतात सुरु असलेल्या जुगारावर LCB पोलिस पथकाने रात्री उशिरा धाड मारली. यावेळी एक जुगारी पळून गेला तर 12 जुगारीना (आरोपी) पकडण्यात LCB पथकला यश आले आहे. त्यांच्याकडून

रोख रक्कम, दुचाकी, जुगाराचे साहित्य असा 6 लाख 94 हजार 460 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि विवीध पोलीस पाठकांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय

देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 25 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदपूर

पोलीस ठाणे हद्दीतील जगळपूर जाणारे रोडवर भगतसिंग पवार याच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता तेथे 1) फारूक अहमद नळगीरे ,45 वर्ष, राहणार हाडोळती.2) भगतसिंग शिवराम पवार, वय 59 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 3) इरफान मुबारक शेख, वय 24 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर

जिल्हा लातूर, 4) सचिन संपत्ती कांबळे, वय 32 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 5) अनिल पुंडलिक साखरे, वय 44 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 6) इनामदार अब्दुल कासिम, वय 48 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 7) अंतेश्वर ज्ञानोबा पवार, वय 27 वर्ष,हाडोळती तालुका

अहमदपूर जिल्हा लातूर, 8) सूर्यकांत माधव गायकवाड, वय 41 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 9) अर्जुन अशोक जाधव, वय 27 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, 10) बालाजी नारायण वसमतकर, वय 54 वर्ष,हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर,11) काशिनाथ तुकाराम पोटसुळवार, वय

57 वर्ष, हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर,12) दस्तगीर रशीद शेख वय 55 वर्ष, राहणार शिवनखेड तालुका अहमदपूर,13) मारुती गुट्टे, राहणार सेलदरा तालुका जळकोट (फरार) हे आरोपी जगळपूर जाणाऱ्या रोडवर भगतसिंग पवार याच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये ग्रुप करून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत

असताना LCB पथकाला आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 06 लाख 94 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सर्व आरोपी विरोधात अहमदपूर पोलिस स्टेशन येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमाल व 12 आरोपीना पुढील तपासासाठी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले . ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार संपत फड, मोहन सुरवसे व पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अमलदार आरदवाड, पोलीस नायक आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल पुठ्ठेवाड आणि कज्जेवाड यानी केली आहे.

Recent Posts