महाराष्ट्र खाकी (चाकूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात विशेषता जिल्ह्यातील शहरात नाईट पेट्रोलिंग वाढवण्यासाठी पोलिसांना नवीन वाहने उपलब्ध करू दिले. या मिळेल पोलिसांची ताकत वाढली. या नवीन वाहनांमुळे जिल्ह्यात दिवसाची आणि
विशेषतः नाईट पेट्रोलिंगचे प्रमाण वाढले. या मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. आणि काही गुन्हे उघडकीस आले. या पेट्रोलिंग मुळे चाकूर पोलिसांनी एक गुन्हा उघड करून आरोपीना मुद्देमालासह आरोपीना अटक केली. चाकूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करनारे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना झरी
खुर्द गावाजवळ एक संशयास्पद पिकअप वाहन अतिशय वेगात दोन गाई घेऊन जात असल्याचे दिसले. त्या वाहणास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी या घटनेची माहिती चाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांना कळवली त्यावरून निकेतन कदम यांनी
उपविभागातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तात्काळ नाकाबंदी लावून सदर पिकअप वाहनाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने झरी गावातून सदरच्या गाई चोरल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याकडे आणखीन सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन चाकूर हद्दीमधील या अगोदर चार वेळा वेगवेगळ्या
ठिकाणाहून त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने जनावरे चोरल्याचे 1) ज्ञानोबा नागनाथ मोहाळे, राहणार कातकरवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. 2) मारुती दंतराव हरगिले, राहणार कासारवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. 3) राजू नारायण पोपतवार, राहणार लांजी तालुका, अहमदपूर जिल्हा लातूर. 4) शेख
कलीम शेख बुर्रहान कुरेशी, राहणार कुरेशी मोहल्ला, पूर्णा जिल्हा परभणी. 5) इरफान उस्मानसाब कुरेशी, राहणार बागवान गल्ली, अहमदपूर जिल्हा लातूर. या आरोपीने कबूल केले आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले 2 गाई, 2 म्हशी, 1 वासरू,1बैल असे एकूण 6 जनावरे व
गुन्ह्यात वापरलेले दोन पिकअप वाहन असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस स्टेशन चाकूर येथील पोलिसांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन
कदम यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्टरित्या तपास करून जनावर चोरीच्या चार गुन्ह्याची उकल करून 6 जनावरे व दोन वाहनासह 8 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर शहर निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री.नरवाडे , पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अमलदार शिरसाठ, मस्के, वाघमारे, लांडगे, पेदे्वाड यांनी पार पाडली.