Latur police पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात मोबाईल हिसकाउन जबरीचोरी करणाऱ्या 3 आरोपींना मुद्देमालासह अटक, शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कामगिरी

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील पोलीस स्टेशन मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन एक मोठी हद्द आणि जास्त राहादारी असलेले पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक पदी संजीवन मिरकले हे आल्या पासून पोलीस स्टेशन हद्दीत शांतता आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले

दिसून येत आहे. आणि एखादा गुन्हा घडलाच तर पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे त्यांच्या अनुभवाच्या मदतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात. काही दिवसापूर्वी एक गुन्हा पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी अटक करून गुन्ह्याची उकल केली. काही दिवसांपूर्वी

अनोळखी आरोपींनी लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एकास अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाण्याची घटना घडली त्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे 392, 34 भादवि ( दुखापत करून लुटणे,लुटण्याचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात

आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्या बाबत निर्देश करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन

मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तयार करून, या पोलीस पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दि. 21 जुलै रोजी पोलीस पथकाला

मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी 1) प्रसाद अंगद कांबळे, वय 19 वर्ष, राहणार साईबाबा नगर, लातूर. 2) आयान अफजल शेख, वय 19 वर्ष, राहणार कपिल नगर, लातूर. 3) ऋषीनाथ बाबुराव गांधले, वय 20 वर्ष, राहणार कपिल नगर, लातूर. यांना लातूर शहरातील

आदर्श कॉलनी परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या आणखीन चार अल्पवयीन साथीदाराच्या साह्याने मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या इसमाना अडवून त्यांच्याकडील मोबाईल

जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील चोरलेले एकूण 30 मोबाईल गुन्हे करताना वापरलेल्या तीन मोटरसायकली असा एकूण 5,66,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपी कडून जप्त केलेल्या मुद्देमालावरून व विविध ठाण्याचे अभिलेख तपासले असता पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील जबरी चोरीचे 4

गुन्हे तर पोलीस ठाणे एमआयडीसी येथील जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार हे पोलीस करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार, पोलीस अंमलदार संजय कांबळे, युवराज गिरी, बालाजी कोतवाड, काकासाहेब बोचरे, पद्माकर लहाने, मिलिंद कांबळे यांनी केली आहे.

Recent Posts