Latur police लातूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात LCB ची कामगिरी

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीत कमालीची घाट दिसून येत आहे. याचे सर्व श्रेय पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना आणि त्यांच्या टीमला जाते, विशेषतः लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील घरफोडीसह इतर गुन्हे आणि अवैद्य धंदे

मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेचे विविध पथके तयार करून जिल्ह्यात

घडलेल्या घरफोड्या संदर्भाने तपास करण्यात येत होता. लातूर जिल्ह्यातील तसेच लातूर जिल्हालगत असलेल्या इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारांची माहिती मिळवण्याकरिता बातमीदार नेमण्यात आले होते. त्यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीच्या तसेच तांत्रिक माहितीचे

बारकाईने विश्लेषण करण्याचे काम सुरू होते.
गोपनीय बातमीदाराकडून विश्वासनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की, लातूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित आरोपी त्यांनी चोरलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह चार चाकी अल्टो कार मधून लातूर शहरात फिरत आहेत.अशी

खात्रीशीर बातमी मिळाल्याने दि. 19 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी लातूर शहरात रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मळवटी रोड जवळील बुरहान नगर येथे पोहोचून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करून

लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार 1) राम दगडू गर्गेवाड, 26 वर्ष, राहणार सिद्धेश्वर नगर पिंटू हॉटेलच्या पाठीमागे लातूर. 2) आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे वय 24 वर्ष राहणार सिद्धेश्वरनगर, मळवटी रोड,लातूर.या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी

त्यांचे आणखीन दोन साथिदारासह लातूर शहरातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे कबूल केले तसेच लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद आरोपी त्यांनी संगणमत करून लातूर शहरातील MIDC पोलीस स्टेशन, औसा

पोलीस स्टेशन , भादा पोलीस स्टेशन , देवणी पोलीस स्टेशन, हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिने व गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन अल्टो कार असा एकूण 2 लाख 68 हजार 300 रुपयेचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला.या आरोपींनी चाकूर उदगीर

येथे चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे यावरून अधिक काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. फरार आरोपी क्रमांक 3 व 4 यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, योगेश गायकवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी बजावली आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे