महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – इर्शालवाडीतील आपद्ग्रस्तांचे मनोधैर्य वाढावे… जे मदतकार्य सुरु आहे त्यात आणखी मदत करावी यासाठी त्याठिकाणी जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी कार्यालयात माध्यमांशी बोलताना दिली. बुधवारपासून संसदेचे
अधिवेशन सुरू झाले आहे. दिल्लीत पोचल्यानंतर इर्शालवाडीवर डोंगर कोसळून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही माहिती मिळताच अधिवेशनाला दिल्लीत गेलेले खासदार सुनिल तटकरे अधिवेशन अर्धवट टाकून तात्काळ इर्शालवाडीकडे आपद्ग्रस्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. इर्शालवाडीतील परिस्थितीचा आढावा घेऊन
अजून काही मदत करता येईल का यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवाय जिल्ह्यातील अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.