Latur news यापुढे तरी आमच्या लातूरची बदनामी करू नये, कासिम रिझवी लातूरचा नव्हता – मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना काल विधानसभेत भाजपा आमदार हरिभाऊ नाना बागडे यांच्याकडुन लातूरची बदनामी करणाऱ्या वक्तव्याचा घेतला समाचार. रझाकार संघटना स्थापन करणारा कासिम रिझवी लातूरचा असल्याचा उल्लेख काल विधानसभेच्या सभगृहाता

भाजपाचे आमदार हरिभाऊ नाना बागडे यांनी केला, या नंतर लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी इतिहासाची योग्य माहिती घ्यावी आणि यापुढे तरी आमच्या लातूरची बदनामी करू नये अशी आमदार हरिभाऊ नाना बागडे यांना आदरपूर्वक विनंती केली आहे. देशाच्या, राज्याच्या आणि मराठवाड्याच्या इतिहासात

आणि राजकारणात खूप मोठा वाटा आहे. लातूरच्या इतिहासात कधी झाले नाही असे आणि इथून पुढे कोणी होणार नाही असा महापौर, लोकप्रतिनिधी म्हणजे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आहेत. गोजमगुंडे यांना लातूर प्रती आणि नागरिकांच्या प्रती असलेली लोकभावना आणि सतत लोकसेवेसाठी तत्पर असलेले, स्व. विलासराव

देशमुख यांच्या प्रमाणेच लातूरला आई समजणारे विक्रांत गोजमगुंडे यांनी काल विधानसभेच्या सभगृहाता मराठवाड्याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर चर्चा होत असताना भाजपाचे आमदार हरिभाऊ नाना बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रझाकार संघटना स्थापन करणारा कासिम रिझवी लातूरचा असल्याचा उल्लेख

केला. आश्चर्य वाटते कि 1944 ला म्हणजे मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्मलेले आणि जवळपास तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून आमदार असलेले हरिभाऊ बागडे यांना इतिहासाची माहिती नसताना त्यांनी असा उल्लेख चक्क सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या विधानसभा सभागृहात केला. माझी त्यांना विनंती असेल की त्यांनी

इतिहासाची योग्य माहिती घ्यावी आणि यापुढे तरी आमच्या लातूरची बदनामी करू नये. कासिम रिझवी हा लातूरचा नव्हता तर त्याचे सासरे हे निजाम सैन्यात लष्करी हुद्यावर असल्याने लातूर येथे राहत त्यामुळे त्याने लातूर येथे वकिली व्यवसाय काही वर्ष केला. त्यांनतर तो हैद्राबाद येथे गेला आणि रझाकार संघटनेचा प्रमुख झाला.

त्याचे शिक्षण अलिगड विद्यापीठातून झालेले होते. खर तर मराठवाड्याचा मुक्ती संग्राम हा कोणत्याही जाती धर्मा विरोधातील नव्हे तर जुलूमी निजाम शासन यांच्या विरोधात सर्वांनी मिळून लढलेली ही लढाई होती. रझाकार संघटनेने त्या काळात अमाप अत्याचार केले हे खरे आहे, आमच्याही पूर्वजांनी याच्या प्रखर झळा सोसल्या आहेत,

पराकोटीचा अन्याय सहन केला परंतु आम्ही कधीही विशेष जाती वर दोष देवून याचे भांडवल केले नाही, आजही सर्वजण गुण्या गोविंदाने लातूर मध्ये राहतात. पण आपला विशेष अजेंडा चालविण्यासाठी विधानसभेत काहीही वक्तव्य करणे आणि त्यासोबत अपुऱ्या माहितीच्या आधारे लातूरची बदनामी करणे हे योग्य नाही. किमान हरिभाऊ
नाना बागडे यांच्या सारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधी कडून तरी अशी अपेक्षा नाही. अशा प्रकारे भाजपचे वरिष्ठ आमदार हरिभाऊ नाना बागडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे