जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटलांकडून स्वसंरक्षणासाठी आरोपी गोळीबार

महाराष्ट्र खाकी (जामखेड / विवेक जगताप) – अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील तपनेश्वर येथे कारचालकाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी

स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, दि.19 रोजी 10 वा. च्या

सुमारास आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांच्या डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील ईर्टिगा गाडीची (एमएच 12 KT

4795) चोरी केली होती. पोलीसांनी सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे